भारतीय ललित कला अकॅडमीच्या मदतीने बेळगांवच्या डाॅ. सोनाली सरनोबत कर्नाटकातील महिला चित्रकारांवरील पुस्तकाचे संकलन करत आहेत. त्यासाठी जुन्या समकालीन तसेच उदयोन्मुख महिला चित्रकारांना त्यांची माहिती आणि कलेचे नमुने पाठविण्याचे आवाहन डाॅ. सरनोबत यांनी केले आहे.
कर्नाटकातील ख्यातनाम नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सोनाली सरनोबत यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने भारतीय कला अकॅडमीवर नियुक्ती केली आहे. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या असून नियती फाऊंडेशन ही गरजूंना मदत करणारी आणि महिलांसह युवा पिढीच्या सक्षमीकरणासाठी झटणारी संस्था चालवतात. नियती फाउंडेशनच्या माध्यमातून डाॅ. सरनोबत करत असलेल्या आदर्शवत कार्याची दखल घेऊन त्यांची अलीकडेच कर्नाटक पशू कल्याण मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या सरनोबत या उद्योजिका देखील आहेत त्या अस्सल वनौषधींचे उत्पादन करून त्यांची निर्यात करतात.
डाॅ. सोनाली सरनोबत या उत्तर कर्नाटकातील एक असामान्य व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्याकडे नेतृत्वाचे सर्व गुण असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर बेळगांवातील कांही जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. एका वेळी अनेक कामे करण्याची त्यांची हातोटी असून त्या आपल्या सर्व भूमिका यशस्वीरित्या पार पाडतात. नियती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अलीकडेच ऑनलाईन शिक्षणासाठी 10 गरजू विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देऊ केले आहेत. हा उपक्रम कांही कारणास्तव गाजावाजा न करता चुपचाप करण्यात आला. नियती फाउंडेशनने असंख्य विद्यार्थिनींना शैक्षणिक विकासासाठी शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आधार दिला आहे.
डाॅ. सोनाली सरनोबत यांनी आता एक नवे कार्य हाती घेतले असून त्या कर्नाटकातील महिला चित्रकारांवरील पुस्तकाचे संकलन करत आहेत. यासाठी जुन्या समकालीन तसेच उदयोन्मुख महिला चित्रकारांनी त्यांच्या उत्कृष्ट पेंटिंगची डिजिटल छायाचित्रे, आपली माहिती, खाजगी अधिकृत छायाचित्रे स्वयम् प्रमाणीत पत्रासह स्वतःच्या परवानगीने प्रसिद्ध करण्यास [email protected] या मेल आयडीवर
पाठवून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. सोनाली सरसोबत संकलित करत असलेले पुस्तक भारतीय ललित कला अकॅडमीच्या मदतीने प्रकाशित केले जाणार आहे.