Tuesday, January 14, 2025

/

पालकमंत्र्यांनी दिला जनतेला सतर्कतेचा इशारा

 belgaum

ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाचा फैलाव पुन्हा मोठ्या प्रमाणात आणि वेगाने सुरु झाला असून या पार्श्वभूमीवर जनतेने सतर्क राहून खबरदारी बाळगण्याची सूचना पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली आहे. व्यक्तिगत, सामाजिक अंतर सातत्याने राखावे, सॅनिटायरझर आणि मास्कचा वापर अवश्य करावा, त्याचप्रमाणे जागरूक रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोविड १९ वर अद्याप लस उपलब्ध झाली नाही परंतु लवकरच यावर लस बाजारात उपलब्ध होईल, ही लस प्रत्येक नागरिकापर्यंत व्यवस्थितरीत्या पोहोचविण्याचे कार्य सरकार करेल. परंतु तोवर जनतेने सरकारने ठरवून दिलेल्या मार्गसूचीचे पालन करावे, असे आवाहन रमेश जारकीहोळी यांनी जनतेला केले आहे.

बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याबरोबरच पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. यासाठी प्रत्येकाने हा संसर्ग रोखण्यासाठी जागरूक राहावे, आणि खबरदारीने राहावे, कमीतकमी ६ फुटांचे अंतर राखावे, या सूचनांचे पालन करावे, उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.Ramesh jarkiholi

१ जानेवारीपासून शाळा – महाविद्यालये सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने योग्य ते सुरक्षेचे उपाय हाती घेणे आवश्यक आहे.

दहावी आणि बारावीच्या वर्गांबाबत सरकारने सूचना दिल्या असून यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी सरकारच्या सूचनेनुसार वर्गखोल्यांची स्वच्छता करून घ्यायला हवी. संसर्ग फैलावाच्या बाबतीत आणि औषधांबाबतीत विद्यार्थी आणि पालकवर्गात भीती निर्माण झाली आहे. यासाठी प्रत्येक शाळा- महाविद्यालयात पथक नेमण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.