बेळगावमध्ये शुक्रवार दि. ४ डिसेंबर आणि शनिवार दि. ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत तीन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यासंदर्भात प्रवक्ते गणेश करनिंग यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.
गांधी भवन येथे आयोजित या कार्यकारिणीच्या बैठकीत गोहत्या प्रतिबंध कायदा तसेच लव्ह जिहाद प्रतिबंध कायदा अंमलात आणण्यासंदर्भात चर्चा झाली असून यासंदर्भात आज सर्वप्रथम निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच ग्रामपंचायत निवडणुकीत ग्राम स्वराज्य समावेश करण्यात येऊन नाविन्यपूर्ण संकल्पना अंमलात आणून किमान शेकडा ८० टक्के उमेदवार विजयी करण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक निवडणुकीत राज्यातील प्रमुख निवडणूक वाढवितात. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात आला आहे.
या निर्णयांसोबतच संघटनात्मक निर्णयासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. शेवटच्या टप्प्यात पक्ष संघटना, शिस्त समिती आणि निवडणूक समितीची रचना करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. पक्षासाठी शिस्त हि अत्यंत महत्वपूर्ण आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे गणेश करनिंग यांनी स्पष्ट केले.