आगामी काळात विदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची कोविड तपासणी अपरिहार्य असेल, कोविड संसर्ग रोखण्याच्या खबरदारीच्या उपायांपैकी हा एक उपाय असेल, असे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले.
बंगळूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली असून ब्रिटनमधून आलेल्या 14 जणांमध्ये कोविड ची लक्षणे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिटन मधून आलेल्या 14 जणांची तपासणी करण्यात आल्यानंतर कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच कोविड चा दुसरा विषाणू पसरत असल्याची बातमीही सोमवारी हाती आली असून यापुढील काळात संसर्ग पसरवण्यापासून रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची कोविड चाचणी करणे आवश्यक आणि अपरिहार्य असल्याचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले.