कर्नाटक आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने एका नव्या आदेशाद्वारे आज बुधवार दि. 9 डिसेंबरपासून राज्यातील कोरोना चांचणीचे दर कमी करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या नव्या आदेशानुसार सरकारी हॉस्पिटलकडून रेफर अर्थात शिफारस केलेल्या खाजगी प्रयोगशाळेतील आरटी-पीसीआर चांचणीचा दर 500 रुपये असणार आहे, अन्यथा खाजगी प्रयोगशाळेतील या चांचणीचा दर 800 रुपये इतका राहील.
रॅपिड अँटीबॉडी टेस्टचा दर 500 रुपये असणार आहे. कोरोनासाठीच्या ट्रूनट टेस्टसाठी 1,250 रुपये दर आकारला जाईल, तर सीबी -एनएएटी चा दर 2,400 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
प्रयोगशाळांनी जर घरामध्ये जाऊन नमुने गोळा केले असतील तर त्यासाठी ते अतिरिक्त 400 रुपये दर आकारू शकतात.