Monday, December 23, 2024

/

‘त्या’ खुनांचे रहस्य अद्याप गूढ!

 belgaum

बेळगावमध्ये विविध ठिकाणी झालेल्या दोन खुनांचा तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. खाजगी कंपनीत काम करणाऱ्या युवकाचा आणि सोनट्टी येथील एका फार्महाऊसवर एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. गेल्या दीड महिन्यात घडलेल्या या दोन खुनांचे गूढ उकलण्यात पोलीस दलाला अद्याप यश आले नाही. या खुनाचा तपास सुरु आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असली तरी दोन्ही प्रकारणांबाबत अद्यापही ठोस सुगावा पोलिसांना मिळाला नाही. यामुळे या खून प्रकरणांचे गूढ वाढले असून खुनात सहभाग असणारे खुनी मात्र मोकाट सुटले आहेत. काकती व मारिहाळ स्थानकात या खून प्रकरणांची नोंद झाली आहे. खुन्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरूच असले तरी गूढ उकलण्यात मात्र यश आले नाही.

सोनट्टी येथील एका फार्महाऊसवर २८ ऑकटोबर 2020 रोजी वोचमन आणि मोलमजुरी म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मण नानाप्पा हुलगण्णावर (वय ४५) चा खून करण्यात आला आहे. काकती विंड मिलच्या मागच्या बाजूस सोनट्टी गावातील शेतातील घरात त्याचा गळा दाबून खून करण्यात आला होता. सोनट्टी जवळील सुनील पाटील नामक व्यक्तीच्या मालकीच्या फार्म हाऊसमध्ये ही घटना घडली आहे. रखवालदारी करतानाच शेतीचे कामही करत होता. २८ ऑक्टोबर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरच्या पहिल्या माडीवर गळा आवळून त्याचा खून करण्यात आला आहे. त्याच्या मुलाने काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून लक्ष्मण हा मूळचा बैलहोंगल तालुक्यातील हन्नीकेराचा राहणारा होता. हा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा अद्याप झाला नाही. या घटनेला दोन महिने उलटायला आले तरी अद्याप धागेदोरे सापडले नाहीत. खुनाचे कारणही गुलदस्त्यात आहे. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळळुर व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. लक्ष्मणच्या खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला आहि. बैलहोंगल व सौंदत्ती तालुक्यात तपास करण्यात येत असून लक्ष्मण केवळ ९ महिन्यांपूर्वी कामानिमित्त सोनट्टीत आला होता. त्याची पत्नी व मुले गावात राहतात. या फार्म हाऊसवर तो एकटाच रहायचा. त्यापूर्वी तो कुठे होता? याचीही माहिती घेण्यात येत आहे. आर्थिक व्यवहारात किंवा अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

२६ नोव्हेंबर रोजी कबलापूर (ता. बेळगाव) जवळ उघडकीस आली आहे. निशिकांत सुभाषराव दहीकांबळे (वय ३१, मूळचा रा. उदगीर, जि. लातूर, महाराष्ट्र) या खाजगी कंपनीत काम करणाऱ्या युवकाचा गोकाक – कबलापूर रोडवर मृतदेह आढळून आला. २५ नोव्हेंबर रोजी रात्री अपहरण करून अज्ञातांनी त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. अपहरणानंतर काही काळ कणबर्गीजवळ त्याला नेण्यात आले होते. त्यानंतर त्याचा खून करून त्याचा मृतदेह खणगाव जवळील कबलापूरजवळ फेकून देण्यात आला होता. या पलीकडे कोणतीही माहिती पोलीस तपासात मिळाली नसल्याचे समजते. निशिकांतचे कुटुंबीय लातूर जिल्ह्यातील उदगीर या गावचे. नोकरीनिमित्त गेल्या अडीच ते तीन वर्षांपूर्वी तो बेळगावला आला होता. गळा चिरून त्याचा खून कोणी केला? याचा उलगडा झालेला नाही. एक दिवस आधी २५ नोव्हेंबर रोजी त्याचे अपहरण झाले होते. अपहरणानंतर युवकाच्या मोबाईलमधून ७ ते ८ जणांना मेसेजही पाठविण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. निशिकांत एका कृषीसंबंधित कंपनीत प्रमुख पदावर नोकरी करत होता. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्याला एक कॉल आला. त्यानंतर निशिकांत आपल्या घराबाहेर पडला तो आलाच नाही. दुसरेदिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. या खुनाच्या तपासाची दिशा बदलण्यासाठी मारेकऱ्यांनी मेसेज पाठविण्याची शक्कल लढविली आहे. या दोन्ही तपासाचे गूढ वाढले असून पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.