जेंव्हा केला जातो कोंबड्याचाही वाढदिवस…

0
1
Cock bdy
 belgaum

गाईचे डोहाळ जेवण केलेल्या बातम्या आपण ऐकल्या असतील.गाय,म्हैस आणि घरी पाळलेल्या जातिवंत कुत्र्याचा धुमधडाक्यात वाढदिवस केलेल्या अनेक बातम्या ऐकल्या आणि वाचल्या आहेत.पण कोंबड्यांचा वाढदिवस केलेले तुम्ही कधी ऐकले आहे काय? ज्या माणसाच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम आहे ती माणसे त्यांना जिवापाड जपतात… अशीच एक घटना बेळगाव शहरातील माळी गल्ली येथे घडली आहे.

घरी पाळलेल्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे .वाचून आश्चर्य वाटले काय?पण हे खरे आहे.घरात पाळलेल्या कोंबड्याचा पाचवा वाढदिवस साजरा केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

माळी गल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते मेघन लंगरकांडे यांनी चक्क कोंबड्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.हा उपक्रम राबवला आहे .त्यांनी साजरा केलेला कोंबड्यांचा वाढदिवस हा एक चर्चेचा विषय बनला आहे.Cock bdy

 belgaum

ज्याप्रमाणे माणसाचा जीव असतो त्याप्रमाणेच प्राण्यांचाही जीव असतो हे या वाढदिवसाच्या निमित्ताने दाखवून देण्यात आले आहे.

परिणामी यापुढे तरी माणसाने असे प्रकार करू नये असाच संदेश असल्याचे दिसून येत आहे याकडे गांभीर्याने लक्ष देणे आणि अनेक प्राण्यांचा जीव वाचवणे ही काळाची गरज ठरणार आहे.आपण घरी ज्या प्राण्यांना पाळतो त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य असल्या सारखे वागणूक द्यावी असा संदेश मेघन यांनी कोंबड्यांचा वाढदिवस साजरा करून वेगळा संदेश दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.