मराठा वेगळे आणि मराठी वेगळे हा अर्थ लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्य करावे. कोणत्याही आंदोलकाबद्दल आम्हाला अनादर किंवा द्वेषभावना नाही, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सांगितले.
बेळगांवमध्ये आयोजित भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आजच्या कर्नाटक बंद संदर्भात उपरोक्त मत व्यक्त केले.
सरकारने सर्व समाजाच्या विकासासाठी महामंडळांची स्थापना केली आहे. तेंव्हा मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापण्यात आलेल्या महामंडळात विरोध करणे योग्य नाही. कर्नाटकची भूमी, पाणी, संस्कृती आणि भाषा याबद्दल भारतीय जनता पक्षदेखील जागरूक आहे. मात्र सर्व समाजाचा विकास व्हावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.
मराठा विकास महामंडळाला कोणीही विरोध करू नये असे आवाहन करून मराठी वेगळे आणि मराठा वेगळे आहे याचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला.