परिवहन संप सुरु असताना माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याची घटना आज बेळगावमध्ये घडली आहे.
आज परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यादरम्यान एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कॅमेरामन वर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रविराज असे या कॅमेरामॅनचे नाव असून हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे.
परिवहन कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सोयी सुविधा देण्यात याव्यात यासाठी आज बंगळूरमध्ये आंदोलन छेडून संप पुकारण्यात आला होता.
दरम्यान या संपला पाठिंबा दर्शविण्यासाठी अचानक बेळगावमध्येही सकाळी सर्व बससेवा ठप्प करण्यात आल्या होत्या. दरम्यान याठिकाणी संबंधित खाजगी वाहिनीचे पत्रकार गेले असता स्टोअर किपरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मार्केट पोलिसांनी घटनास्थळावरून हल्लेखोराला अटक केली आहे.