सोमवारी सकाळी बेळगावातील केंद्रीय बस स्थानकाला सकाळी सकाळी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ,पोलीस आयुक्त के त्यागराजन, एस पी लक्ष्मण निंबरगी यांनी भेट दिली.त्यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात बस सेवा सुरू झाली प्रवाश्यांनी न घाबरता बस मधून प्रवास करायला हरकत नाही कारण प्रत्येक बस मधून पोलीस देखील प्रवास करताहेत.बस ना पोलीस एसकोर्ट मिळत आहे.
रविवारी रात्रीचं पोलिसांनी युनियनच्या आंदोलकांना बाजूला काढले होते आंदोलन स्थळ रिकामी केले होते.रात्री पासूनच आंदोलन स्थळी कुणी येऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती त्या नंतर बेळगाव जिल्हा प्रशासनाने सोमवारी सकाळी बस सेवा बहाल केली.
पोलिसांनी जाणून बुजून बस सेवा सुरू करायच्या उद्देशानेच या आंदोलकांना बाजूला काढले व पोलीस बंदोबस्तात सर्वच रूटवर बससेवा सुरू केली.
जिल्ह्यातील रामदुर्ग सह अनेक डेपो मधूनबस बेळगावला आल्या आहेत. सकाळी अधिकाऱ्यांनी बस स्थानकाला भेट देत कोणतेही समस्या प्रवाश्यांना उद्धवू नये यासाठी प्रयत्न केले.
बस स्थानकात प्रवासी वाढू लागले आहेतआणि पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.रविवारी सरकार सोबत राज्य परिवहन खात्याच्या कर्मचारी युनियन संप मिटल्याची घोषणा केली होती मात्र काही तासांतच पुन्हासंप सुरू राहील असेही म्हटले होते मात्र पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत प्रवाश्यांचे हाल रोखण्यासाठी बस सेवा बहाल करण्यात आली आहे.