Saturday, December 21, 2024

/

बुडा “या” ठिकाणी हाती घेणार 28.77 कोटींची विकासकामे!

 belgaum

बेळगांव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाने रामतीर्थ नगर येथील विकास कामांसाठी निविदा काढल्या असून एकूण 28 पूर्णांक 77 कोटी रुपये खर्चाची विकास कामे लवकरच याठिकाणी हाती घेतली जाणार आहेत.

शहरातील रामतीर्थनगर येथील नियोजित विकास कामे आणि मंजूर निधी याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. स्कीम नं. 35 रामतीर्थनगर येथील आरएस नं. 629, 630 आणि 644 येथील रस्त्याच्या आरसीसी ड्रेनेज बांधकामासाठी 4,36,16,391.05 रुपये. स्कीम नं. 35, 43 व 43 ए मधील आरसीसी नाला,

 

रस्त्याचा विकास आणि मुख्य रस्त्यावरील डेकोरेटिव्ह लाईटसाठी 4,71,03,742.55 रुपये. स्कीम नं. 35 मधील आरएस नं. 571, 609 व 611 येथील रस्त्याच्या आरसीसी ड्रेनेज बांधकामासाठी 4,02,97,847.56 रुपये. स्कीम नं. 35, 43 43 ए येथील मुख्य रस्त्याच्या रोडसाईड शोल्डरसाठी पेव्हर्स उपलब्ध करून देण्यासाठी 4,98,68,572. 94 रुपये.

स्कीम नं. 25, 43 व 43 ए येथील आरएस नं. 607, 608, 611 व 612 येथील उद्यानाचा विकास करण्यासाठी (फेन्सिंग, पेव्हर्स व उद्यानातील दिवे) 1,95,76,211.90 रुपये. स्कीम नं. 35 च्या आरएस नं. 542, 543 व 568 येथील रस्त्याच्या आरसीसी ड्रेनेज बांधकामासाठी 4,73,71,022.80 रुपये. स्कीम नंबर 35 मधील आरएस नं. 549, 532 व 533 येथील रस्त्याच्या आरसीसी ड्रेनेज बांधकामासाठी 4,17,50,828.61 रुपये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.