सीमाभागातील मराठी जनतेच्या बाजूने कोणीही आपले मत व्यक्त केले कि, मराठीद्वेष्ट्यांचा थयथयाट होणे हे सीमाभागातील मराठी जनतेसाठी नवे नाही. शनिवार दि. २६ डिसेंबर रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सीमाप्रश्नासंदर्भात केलेल्या विधानासंदर्भात काहींनी सोशल साईटच्या माध्यमातून थयथयाट सुरु केला आहे.
बेळगावमध्ये आयोजित शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या तत्वानुसार स्वराज्य निर्मितीप्रमाणे कार्यरत रहावे, आणि सीमाप्रश्नाशी निष्ठा ठेऊन कार्यरत राहावे असे आवाहन केले होते. यासंदर्भातील बातम्या झळकताच आज अनेक संघटना आणि कार्यकर्त्यांनी सोशल साईटवर संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे.
बेळगावमधील समस्त मराठी जनतेची महाराष्ट्रात जाण्याची जी इच्छा आहे तीच इच्छा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचीही आहे.
त्यामुळे प्रत्येक मराठी तरुणाने सीमाप्रश्न सोडवणूक आणि महाराष्ट्रात जाण्याची इच्छा बाळगून त्याच निष्ठेने कार्य करण्याचे आवाहन संभाजी भिडे यांनीं केले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर काहीं भाषिक संघटनांनी विरोध व्यक्त करण्यास सुरुवात केली असून बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजिण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीबाबतही गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे.