Friday, December 27, 2024

/

बेळगांव ट्रेकर्स ग्रुपने केले महाराष्ट्रातील तीन किल्ले सर

 belgaum

शहरातील बेळगांव ट्रेकर्स ग्रुपने नाशिक जिल्ह्यातील (महाराष्ट्र) आलंगगड, मदनगड व कुलंगगड हे तीन किल्ले यशस्वीरित्या सर करण्याचा पराक्रम नुकताच केला आहे.

बेळगांव ट्रॅकर्स ग्रुपच्या सदस्यांनी गेल्या शुक्रवारी बेळगांवातून नाशिकच्या दिशेने प्रयाण केले. त्यानंतर शनिवारी व रविवारी किल्ल्यांची सफर करून सर्व ट्रेकर्स सोमवारी (ता. 14) बेळगांवला परतले. बेळगावच्या बेळगाव ट्रेकर्स समूहाने एएमके म्हणजे अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड या दुर्गांचे यशस्वीरीत्या ट्रेकिंग पूर्ण केले. सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगररांगेमध्ये हे किल्ले समुद्रसपाटी पासून ४८52 फूट उंचीवर आहेत. अतिशय कठीण आणि बिकट वाट असलेल्या या किल्ल्यांचे पर्वतारोहण करताना बेळगावच्या ट्रेकर्सना अलंगवर २५ आणि ५० फुटाचा रॉक पॅच तर मदनवर ४० फुटांचा रॉक पॅच करण्याचा अनुभव आला. या सोबत गर्द आणि वाट चुकवणारे रस्तेही या किल्ल्यांवर आहेत. गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या कमी जास्त प्रमाणात धोकादायक आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता हा ट्रेक कठीण प्रकारात मोडतो. तथापि बेळगाव ट्रेकर्स ग्रुपने शिस्तीने, धीराने आणि आवडीने हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला.

उपरोक्त किल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कांही अंतर जंगलातून सफारी करावी लागते. त्यानंतर 25 आणि 50 फूट अशा दोन ठिकाणी दोरीवरून वर चढावे लागते. त्यानतंर धोकादायक पायऱ्यांवर जावे लागते. त्यानंतर आपण किल्यावर पोहचतो. बेळगाव ट्रेकर्स ग्रुपमध्ये ज्ञानेश्वर पाटील, विशाल सावंत, ऋषीकेश पुणेकर, उमेश बेळगुचे, संदिप डोणकरी, सुहास काकेरू, प्रसाद बुलबुले, जोतिबा चोपडे, सागर हंची, ऋषिकेश मुचंडी विनायक कित्तूर, महेश बेळगावकर, सुरज आपटेकर, विजय तोडकर आदी सदस्यांचा समावेश होता. बेळगांव ट्रेकर्स ग्रुपने यापूर्वी कळसुबाई, हरिहर फोर्ट, हरिशचंद्र फोर्ट, कलावंतीन दुर्ग आदी किल्ले सर केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.