Wednesday, December 25, 2024

/

हुबळी – बेळगावसाठी नॉनस्टॉप वोल्वो

 belgaum

लॉकडाऊनपासून तब्बल ९ महिने बंद असलेली हुबळी – बेळगाव ची नॉनस्टॉप बससेवा पुन्हा सुरळीत होणार आहे. वायव्य कर्नाटक रस्ते आणि परिवहन खात्याने यासाठी दुजोरा दिला आहे.

हुबळी – बेळगाव साठी नॉनस्टॉप बससेवा पूर्ववत होणार आहे. ही बस सेवा हुबळी येथील गोकुळ रस्त्यावर असणाऱ्या नव्या बसस्थानकावरून सुरु होणार असल्याची माहिती हुबळी परिवहन विभागाने दिली आहे.volvo

सकाळी ८-३०,९-००,११-१५, दुपारी १२-४५, ३-००, ३-३०, सायंकाळी ५-३० आणि ६.०० या वेळेत हुबळी आणि बेळगाव साठी ही बस धावणार आहे.

या बसच्या माध्यमातून बेळगाव – हुबळी प्रवासासाठी अवघ्या १.१५० तसंच अवधी लागणार आहे. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हुबळी परिवहन विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.