Sunday, November 17, 2024

/

पहिल्या टप्प्यातील मतप्रक्रिया शांततेत

 belgaum

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात एकूण ७ तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक आणि मुडलगी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आजची मतप्रक्रिया पार पडली आहे. या सातही तालुक्यांमध्ये आज ८२.७० टक्के मतदान झाले आहे.

एकूण दोन टप्प्यात होणाऱ्या या निवडणूका जिल्ह्यातील ४७७ ग्रमपंचायतींसाठी होणार होत्या. त्यापैकी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील २५९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक आज पार पडल्या आहेत. एकूण ४२५९ पदांसाठी हि निवडणूक घेण्यात आली असून यातील ४३७ जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. १४ जागांसाठी नामपञ दाखल करण्यात आले नसून उर्वरित ३८०८ जागांसाठी आजची निवडणूक पार पडली. या ३८०८ जागांसाठी तब्बल ११२५६ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात सहभाग घटेल होता.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत बेळगाव तालुक्याचा समावेश होता. आज झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान हे बेळगाव तालुक्यात झाले असून अंदाजे ८६.६० टक्के मतदान झाल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तर गोकाक तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच ७९.१७ टक्के मतदान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगाव तालुका ८६.६० टक्के, खानापूर ७९.२१ टक्के, हुक्केरी ८४.२ टक्के, बैलहोंगल ८० टक्के, कित्तूर ८४.४२ टक्के, गोकाक ७९.१७ आणि मुडलगी ८२.२१ टक्के अशापद्धतीने आजची मतप्रक्रिया पार पडली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीदरम्यान जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अनेक मतदान केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली.

सकाळी ७ पासून ९ पर्यंत केवळ ७.२२ टक्के मतदान पार पडले होते. त्यानंतर ९ ते ११ या कालावधीत १८.४४ टक्के आणि दुपारी १ पर्यंत ३३.४ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी ३ पर्यंत ५८.७७ आणि सायंकाळी ५ पर्यंत एकूण तालुक्यात ८२.७० टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.Gp election

दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणूक येत्या २७ डिसेंबर रोजी होणार असून पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकाही सुरळीत पार पाडाव्या, यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. या निवडणुकीचे निकाल ३० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत.

मतपेट्या ‘सीपीएड’ सुरक्षा केंद्रात

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या शहरातील सीपीएड मैदानावरील मतदान केंद्रात सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आल्या. सीपीएड येथील स्ट्रॉंग रूममध्ये या मतपेट्या ठेवण्यात आल्या असून मतमोजणी दिवशी या पेट्या मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचविण्यात येणार आहेत.

बेळगाव तालुक्यातील मतदान प्रक्रिया सायंकाळी 5 नंतरही अनेक केंद्रांवर सुरूच होती. मतप्रक्रिया उशिरा संपल्यानंतर मतपेट्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या. कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षाव्यवस्थेत या मतपेट्या सीपीएड येथील सुरक्षा केंद्राच्या ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.