राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जारी केली असून यामध्ये मध्यविक्रीवर नियंत्रणासाठी विविध विभागात स्वतंत्र प्रतिबंधक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
दोन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मद्यविक्री, मद्य साठा, बनावट दारू, परराज्यातून होणारी मद्य तस्करी या सर्व गोष्टींवर रोख लावण्यासाठी मद्यबंदी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.
यासंदर्भात अबकारी खात्याने पाऊल उचलले असून आचारसंहिता लागू असलेल्या काळात बनावट दारू साठा आणि विक्री, बेकायदेशीर रित्या करण्यात येणारा मद्यसाठा आणि मद्यविक्री, परराज्यातून होणारी मद्यविक्री या सर्वावर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. यासंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास या नियंत्रण कक्षाच्या संबंधित संपर्क क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन अबकारी खात्याच्यावतीने करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा कंट्रोल रूम ०८३१ -२४७५१९२
बैलहोंगल / कित्तूर परिसर
०८२८८ -२३३७१७ ९२४१७६७६६७ .
बेळगाव परिसर १
०८३१ -२४७५१९३ ९७४०७७०४१४
बेळगाव परिसर २
०८३१ -२४७५१९३ ८२७७३६५८३३
बेळगाव परिसर 3
०८३३८ -२७४७६५ 9902021934
खानापूर परिसर
०८३३६ -२२३४०२ ९०७११२७०८६
सवदत्ती परिसर
०८३३० -२२२८७६ – ९९०२३४४५४६
रामदुर्ग परिसर
०८३३५ -२४१५२० ९५३८६०८६४१
बेळगाव उपविभाग
०८३१ -२४७५१९२ ९४४९५९७०७२
९४४९५९७०७३
रामदुर्ग उपविभाग
०८३३५ -२४३०४६ -९४४९५९७०७४
९४४९५९७०७५
अबकारी उपायुक्त, बेळगाव जिल्हा
९४४९५९७०६९ , ९४४९५९७०७१
नागरिकांना कोणत्याही प्रकारचे संशयित वातावरण जाणवल्यास वरील संपर्क क्रमांकाशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन अबकारी खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.