बेळगांव येथील एक्स फिटनेस क्लबच्या सदस्यांनी हिमालय पर्वत रांगेमधील ब्रह्मताल पर्वत शिखर नुकतेच यशस्वीरित्या पादाक्रांत करण्याचा पराक्रम केला आहे.
ब्रह्मताल हा पर्वत उत्तराखंड राज्यातील लोहाजंग या ठिकाणी असून समुद्र सपाटीपासून १२२५० फूट ही या पर्वताची उंची आहे. या पर्वतावरून भारतातील महत्वाचे मानले जाणारे त्रिशूल पर्वत, नंदागुंटी पर्वत, हाथी पर्वत, देवतोली, मैकोतोली व बेहरोतोली या पर्वतांचे नयन रम्य दृश्यहि पाहायला मिळते.
तसेच हि आशिया खंडमधील सर्वात लांब पर्वत रांग मानली जाते. बेळगांवच्या एक्स फिटनेस क्लबच्या सदस्यांनी -8′ तापमानामध्ये हि मोहीम यशश्वी केली हे विशेष आहे. पर्वताची खडतर वाट पादाक्रांत करण्यासाठी त्यांना भरपूर मेहनत घ्यावी लागली असून गेल्या 3 महिन्या पासून ग्रुपचे संचालक डेलमन जेविअर यांच्या मार्गदर्शना खाली शारीरिक सराव केला आहे. ब्रह्मताल पर्वत शिखराची चढाई हि 4 दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आली.
या मोहिमेमध्ये बेळगांवचे डेलमन जेविअर, निधी मकदूम, जगदीश देसाई, भूषण देसाई, कादंबरी देसाई, प्रकाश देसाई, डेन्स्टन जेविअर, नंदिनी भट, राजमोहन नायक, श्रीनिवास अंगडी, सुहास पाटील, सौजन्या, शिलकी गुप्ता, गौरी पाटील, रिषद, पूर्वा सोळंकी-पाटील, वैष्णवी भोसले, अश्विनी शांताकुमार, आदर्श मुरगोड, रोशन सिंघानिया, तेजस पांडे, कनिष्क, प्रतीक आणि चिराग यांनी सहभाग दर्शविला.