जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होत असून आज जिल्ह्यात नव्या १२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच अद्याप २०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यासोबतच कोरोनापासून आज १६ रुग्णांना मुक्ती मिळाली आहे.
जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी अशी आहे – एकूण चाचण्या : ३७१३२९, एकूण नमुने तपासणी : ३७०२३८, निगेटिव्ह
आलेल्या रुग्णांची संख्या : ३३६४२१, आजपर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या : २६१७५, एकूण कोरोना मृतांची संख्या : ३४२,
आजपर्यंतच्या कोरोना मुक्त रुग्णांची संख्या : २५६२७, सध्या कोरोनावर उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या : २०६, आजच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : १२.
तालुकानिहाय रुग्णांची संख्या : बेळगाव ६, बैलहोंगल १, अथणी १, खानापूर २, चिकोडी २.