बेळगावात वाढली थंडी
डिसेंम्बर महिना संपायला आला तरी ढगाळ वातावरणामुळे बेळगाव परिसरात यंदा कमी थंडी होती मात्र मंगळवारी सकाळी पासूनच हवेत गारठा असल्याने बेळगाव शहर आणि परिसर रात्री गारठून गेले होते.
मंगळवारी रात्री बेळगाव शहराचा पारा घसरला असून रात्री अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून गरमीची ऊब घेतली जात होती. गेल्या 24 तासात शहरात कमाल तापमान 28.3 तर किमान तापमान 11.3 नोंद करण्यात आली आहे.हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनीही पारा घसरला असल्याचा दुजोरा दिला आहे.
बेळगावात डिसेंम्बर महिन्यात कडाक्याची थंडी असते मात्र यावर्षी थंडी उशिरा पडायला सुरुवात झाली.