विणकाम क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी भोपळा ही थीम घेवून लोकरिपसून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती केली आहे.
लहानपणी एकलेल्या भोपळा आणि म्हातारीची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे.त्यातील म्हातारी आणि मुलगी देखील पाहायला मिळतात.
भोपळ्यावर बसलेली म्हातारी आणि मुलगी लक्ष वेधून घेतात.याशिवाय विवीध रंगाचे भोपलेही लोकरी पासून केल्या आहेत.हत्ती,मांजर, उंदिर,कासव,लेडी बर्ड ,बदक हे भोपळ्यावर बसलेले पाहायला मिळतात.तीन वेगवेगळ्या प्रकारचे बेडूक ही लोकरिपासून तयार केले आहेत.
आशा पत्रावळी यांची यापूर्वी लिंक बुक आणि अन्य रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाली आहे.केवळ दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या आशा पत्रावळी यांची विणकाम या विषयावरची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत.अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत.अनेक तरुणी,महिलांना त्यांनी विणकाम प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर होण्यास मदत केली आहे.