Wednesday, October 23, 2024

/

कोविड रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाली असून सध्या २५० पेक्षा कमी रुग्ण सध्या कोविड वर उपचार घेत आहेत.
बुधवारी राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिन नुसार कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४७ वर येऊन स्थिरावली आहे.

आज नव्या २२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून ४९ जणांना कोरोनापासून मुक्ती मिळाली आहे.

अजूनही ३२९७ रुग्णांचे अहवाल येणे बाकी असून आजपर्यंतच्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २५७०२ इतकी असून आजपर्यंत एकूण २५११४ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण ३४१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.