मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या घोषणेनंतर काही कन्नड संघटनांनी याला विरोध दर्शवून कर्नाटक बंदची हाक दिली आहे. या कर्नाटक बंदची हाक देणाऱ्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला असून बंद ची हाक देणाऱ्यांवर सक्तीची कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.
बंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, महाजन अहवाल हा अंतिम असून कर्नाटकातील मराठी भाषिक हे कर्नाटक राज्याचे नागरिक आहेत. मराठा विकास प्राधिकरण हे मराठा समाजच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापण्याचा उद्देश असून मराठा समाजातील तमाम मराठी भाषिकांसह इतर भाषिक हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत. बेळगावमध्ये झालेल्या विश्वसंमेलनात या समाजाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मराठा विकास प्राधिकरणाच्या विरोधासाठी ५ डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक देण्यात आली आहे. परंतु हा बंद पुकारण्यात येऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल. जनता गोंधळून जाईल. विनाकारण बंदची हाक देण्यात येऊ नये असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कर्नाटकातील मराठा समाजाचा विकास व्हावा, हा एकाच उद्देश सरकारने डोळ्यासमोर ठेऊन मराठा विकास प्राधिकरणाची घोषणा केली आहे. याबाबतीत कोणत्याही पद्धतीचे राजकारण करण्याचे कारण नाही. याविरोधात जाऊन बंदीसाठी चालना देणाऱ्यांविरोधात सक्तीची कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला.