कौटुंबिक मालमत्तेच्या वादासंदर्भात आपल्या पतीसह आपल्याला त्रास देत असल्याच्या कारणास्तव नसलापूर येथील महिलेने न्याय मिळवण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत धरणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले.
रायबाग तालुक्यातील नसलापूर या गावातील बंडू चावरे यांची पत्नी संगीता चावरे यांनी आपल्या दोन मुलींसह आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. आपल्यासह आपल्या संपूर्ण कुटुंबाला मालमत्तेच्या वादातून इतर नातेवाईक त्रास देत असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
रायबाग तालुक्यातील नसलापूर या गावात बंडू चावरे यांच्या मालकीची ३ एकर ५ गुंठे जमीन आहे. या जमिनीच्या वाटणीसंदर्भात इतर नातेवाईक विनाकारण त्रास देत असून जीवघेणी भाषा करत आहेत.
यासंदर्भात रायबाग पोलिसांकडे तसेच तहसीलदारांकडे तकार करण्यात आली होती. परंतु याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी मागणी करत असल्याची माहिती संगीता चावरे यांनी दिली.
या प्रकरणी लक्ष घालून न्याय मिळवून न दिल्यास अहोरात्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा या कुटुंबीयांनी दिला. दरम्यान आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या पती आणि मुलींसह निवेदन देण्यात आले आहे.