शहापूर पोलीस स्थानक व्याप्तीमधील युवकांच्या दोन गटातील वादाचे पर्यवसान होऊन झालेल्या दगडफेकीत एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
रविवारी सायंकाळी दगडफेक झाल्याने खासबाग येथील जयवंती मंगल कार्यालय जवळील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
युवकांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला त्यामुळे झालेल्या दगडफेक मध्ये एक युवक जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.
दगडफेक झाल्यावर शहापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.