बेळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात तीन ठार व दोन जखमी झाले आहेत. खानापूर काटगाळी जवळील अपघातात दोन ठार तर संकेश्वर जवळील अपघातात एक ठार झाले आहेत.
बेळगाव खानापूर मार्गावरील काटगाळी गावानजीक कमल नगर येथे एका डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बहिण-भाऊ दोघे जण ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी घडली
घटनास्थळा वरून समजलेल्या अधिक माहिती नुसार अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे रेणुका रमेश यग्गुर ( वय 28 ) आणि कमलेश करेप्पा करवी ( वय 25 ) अशी आहेत हे दोघेही बहीण-भाऊ होते .हे दोघेही देसुर येथील डेपोच्या ठिकाणी चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून सेवा करीत होते. हे दोघे बहिण-भाऊ दुचाकीवरून देसुरकडे निघाले होते . डंपरला ओव्हरटेक करून जाण्याच्या प्रयत्नात दुचाकी या अवजड वाहनांच्या खाली आली. त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. रेणुकाचा विवाह झाला होता. तीच्या पश्चात पती आणि दोन मुले आहेत.
संकेश्वरजवळ दुचाकी अपघातामध्ये १ ठार २ जखमी
भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या पादचरयास धडक बसल्याने झालेल्या अपघातामध्ये एक ठार , दोन जखमी झाल्याची घडली आहे. हि घटना संकेश्वर-चिकोडी मार्गावर कामातानुर ( ता. हुक्केरी ) येथे घडली आहे . शंकर निगाप्पा हिरेकोडी ( वय वर्षे ६५ ) असे अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे . तसेच जखमी झालेल्यांमध्ये भीमगौन्डा बाळगौन्डा पाटील ( वय वर्षे ५८ ) राहणार कमतनुर( ता.हुक्केरी ) हा जखमी झाला असून याला गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . तर दुचाकीवर मागे बसलेला मनोजकुमार ( रा. नरके मदन्हालळी , पोस्ट ता. शिरवळ , जिल्हा . चीक्क्बल्लापूर) सध्या राहणार गणेशपूर बेळगाव हा जखमी झाल्याने याला उपचारासाठी संकेश्वर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे .
चालक दिनेश चिक्क भैराप्पा ( वय २१ वर्षे ) राहणार बेळगाव आणि पाठीमागे मनोजकुमार हे आपल्या बजाज डिस्कवर ( ka २२ HB ९३९४ ) वरून चिक्कोडी हून बेळगावकडे येत असताना समोरील वाहनाला ओवर टेक करीत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने कमतनुर गावाजवळ रस्त्याच्या बाजूच्या पादचाऱ्याला धडक बसल्याने दिनेश , शंकर आणि मनोजकुमार जखमी झाले त्यांना उपचारा साठी द्वाखाण्य्मध्ये दाखल करण्यात आले होते . उपचार सुरु असतानाचा शंकरचा मृत्यु झाला . सदर घटनेची नोंद प्रकाश हिरेकोडी यांच्या फिर्यादीवरून संकेश्वर पोलिसात झाली आहे .