Saturday, January 11, 2025

/

बसखाली सापडून दुचाकीस्वार विद्यार्थी जागीच ठार

 belgaum

ॲक्टिवा दुचाकीवरून निघालेला एक विद्यार्थी बसखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना भाग्यनगर तिसरा क्रॉस येथे आज दुपारी घडली.

तनय मनोज हुईलगोळ (वय 19 रा, भाग्यनगर 10 वा क्रॉस) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे. सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनगोळ मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनगोळला जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बस गाड्या भाग्यनगर मार्गे वळवण्यात आल्या आहेत. Tanay huilgol

आज दुपारी 3 च्या सुमारास तनय हुईलगोळ आपल्या ॲक्टिवा दुचाकीवरून निघाला असता भाग्यनगर तिसरा क्रॉस येथे परिवहन बसला धडकून तो थेट बसच्या चाकाखाली आला. परिणामी जागीच त्याचा मृत्यू झाला.

तनय हा गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकत होता. बेळगावातील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट मनोज हुईलगोळ यांचा तो एकुलता एक मुलगा होता.त्याच्या आकस्मिक अपघाती मृत्यूमुळे हुईलगोळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तनय याच्यावर आज शनिवारी रात्री 9:30 वाजता शहापूर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. बेळगाव रहदारी दक्षिण स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.भाग्यनगर रोड देखील धोकादायक बनला आहे.

तनय हा मनोज हुईलगोळ यांचा मुलगा असून तो सेंट पॉल शाळेचा हुशार विद्यार्थी होता.मनोज हुईलगोळ रोटरी क्लबचे सदस्य असून सी ए आहेत तनयचे आजोबा देखील सी ए आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.