निपाणी तालुक्यातील कोगनोळी गावाजवळ बेकायदेशीर रित्या हरण शिंगांची तस्करी करणाऱ्या जोडगोळीला अटक करण्यात पोलीस अरण्य वाहतूक दलाला यश आले आहे. पोलीस अरण्य वाहतूक दलाच्या पीएसआय रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.
या कारवाईत महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील तेजस तानाजी पाटील (वय २४) आणि तुषार तानाजी पाटील (वय २९) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून २ हरणशिंगे जप्त करण्यात आली असून हे दोघेही अनेक अरण्यांना भेट देऊन तेथील हरणशिंगांची बेकायदेशीर रित्या तस्करी करत असल्याची माहिती कारवाई करणाऱ्या पोलिसांना मिळाली आहे.
या कारवाईत आर. बी. यर्नाळ, एस. आर., के. डी. हिरेमठ, सीएच आणि वाहन चालक बी. इंगळी यांनी सहभाग घेतला.