गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये १८ नोव्हेंबर २०२० या दिवशी रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी अनेक जण आपले कौशल्य जपत असतात. वेगवान ऑस्ट्रेलियन सेट चे १०० मीटरचे रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी बेळगावमधील इनलाईन स्केटिंग मधील अभिषेक नावले हा स्केटिंगपटू सज्ज झाला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन स्केटिंगपटू डेव्हिड साल्सबरी याने वेगवान १०० मीटर इनलाईन स्केटिंगसाठी रेकॉर्ड बनविले आहे.
अभिषेक नावले हा बेळगावच्या रोलर स्केटिंग अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असून रामतीर्थ नगर येथील गणेश सर्कल, केएसआरटीसी डेपो येथून १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता या रेकॉर्डसाठी प्रयत्न करणार आहे.
अभिषेक नावले हा गेल्या १४ वर्षांपासून स्केटिंगचे प्रशिक्षण घेत असून त्याने यापूर्वीही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे. स्केटिंग स्पर्धा, स्केटिंग रॅली, स्केटिंग इव्हेंट्स यामध्ये अभिषेकने यशस्वी सहभाग घेतला आहे.
त्याला रोलर स्केटिंग अकादमीच्या उमेश कलघटगी, कमलकिशोर जोशी, सूर्यकांत हिंडलगेकर, कृष्णकुमार जोशी, विजयकुमार पाटील, सी. एस बिदनाळ, श्रीमती विजया हिरेमठ, विशाल वासाने, योगेश कुलकर्णी, डी. ए. सायनेकर, सुशीलकुमार कोकाटे, राजू माळवदे, प्रवीण हिरेमठ आणि कुटुंबियांचे मार्गदर्शन लाभले आहे.
१८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या उपक्रमात अभिषेक नावलेला बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी, रोटरी कार्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी, केएसआरटीसी कर्मचारी, जायंट्स परिवार, युनिक स्पोर्टिंग अकादमी, एस. के. इंटरनॅशनल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकादमीचे सहकार्य लाभत आहे.