राज्यातील पदवीपूर्व महाविद्यालय सुरू झाली असून प्राध्यापक व विद्यार्थ्यांना कोरोना तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगांव शहरातील तीन महाविद्यालयांमधील एकूण 6 प्राध्यापकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
बेळगांव शहरातील कॉलेज अर्थात महाविद्यालयांमध्ये 2,027 कर्मचारी असून त्यांचे स्वॅबचे नमुने (घशातील द्राव) घेऊन कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
त्यानंतर रजेवर असलेल्या 250 जणांची तपासणी करण्यात आली असता यामध्ये शहरातील तीन महाविद्यालयांमधील एकूण 6 प्राध्यापकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
या पद्धतीने महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिका कोरोनाग्रस्त झाल्याचे कळताच पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पालक वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून मुलांना महाविद्यालयात पाठवायचे की नाही? या संभ्रमात ते पडले आहेत.