केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची पोट निवडणूक दोन ते तीन महिन्यात होणार आहे.या पाश्वभूमीवर राष्ट्रीय पक्षा बरोबर बेळगावच्या मराठी भाषिकांचा मानबिंदू बनत चाललेल्या शिवसेना ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नुकताच बेळगावात झालेल्या काळ्या दिनी शिवसेनेने आक्रमक होऊन राज्यातील मंत्रिमंडळाला दंडाला काळ्या फिती बांधून एक दिवस कामकाज करत सीमा लढ्याला बळ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.विशेष करून सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगाव बाबत अधिक सजगता दाखवत मराठी लोकांचा लढा कसा पुढे नेता येईल यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
मागील 2019 लोकसभा निवडणुकीत अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने तब्बल 56 उमेदवार रिंगणात उतरवले होते म्हणावा तेवढा प्रचार देखील केला नव्हता तरी देखील सर्व जवळपास 60 हजार अशी लक्षनिय मते पडली होती.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर महत्वाच्या निवडणुका नजरसमोर ठेऊन लोकसभेची पोट निवडणूक देखील लढवण्याची तयारी चालवण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत.बेळगाव शिवसेना नेत्यांनी आणि शुभ चिंतकानी पक्ष वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली असून लवकरच याबाबत रणनीती ठरवली जाणार आहे.शिवसेना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोट निवडणुकीत सेनेचा ध्यायचं आणि त्याला राष्ट्रवादी आणि एकीकरण समितीकडून पाठिंबा मिळवत प्रचार करायचा आणि जेणे करून मराठी वोट भाजप किंवा काँग्रेसच्या दावणीला न बांधता कशी सुरक्षित ठेवता येईल यावर रणनीती आखली जात आहे. पोटनिवडणुकीतील बेळगावातील असावा किंवा मुंबईतील कोणता ग्लॅमरस चेहरा असावा याबाबत देखील स्थानिक शिवसेना नेत्यात खल चालू आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने तरी अद्याप पोट निवडणूक लढवण्याबाबत कोणतेच भाष्य केले नाही मात्र समितीच्या निष्क्रियतेची पोकळी भरून काढण्यासाठी शिवसेना हाच पर्याय शिल्लक आहे आणि सेनेच्या बाणाला बेळगावात आदर आहे त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजप काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांकडे जाणारी वोट बँक मराठी टक्का थांबवण्यासाठी हा योग्य पर्याय होऊ शकतो असेही जाणकारांचे म्हणणे आहे.
याबाबत लवकरच स्थानिक शिवसेना व काही जण मुंबईला जाणार आहेत व पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत.