अवघ्या सात वर्षाच्या पालिकेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी मच्छे येथे उघडकीस आली आहे आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी यामुळे खळबळ उडाली आहे.
सृष्टी मंजुनाथ कित्तूरकर (सध्या रा. संभाजीनगर मच्छे, मूळ रा. तेरवाड ता. हल्याळ) असे आत्महत्या करणाऱ्या बालिकेचे नांव आहे. सृष्टीच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी लहान भावाची सायकल खेळण्यास आईने मज्जाव केला तसेच वडीलांनी बाजारात नेले नाही म्हणून रागाच्या भरात तिने आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. घरातील अडगळीच्या खोलीत ओढणीने गळफास लावून सृष्टीने आत्महत्या केली. एखादी 7 वर्षाची अजाण बालिका गळफास घेऊन कशी काय आत्महत्या करू शकते? याबाबत पोलिस देखील हैराण आहेत. सदर घटनेची वडगांव पोलिस स्थानकात नोंद झाली असून पोलिस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर अधिक तपास करीत आहेत.