Wednesday, November 27, 2024

/

आर टी ओ कार्यालयासाठी यमनापूर मध्ये 4 एकर जमीन मंजूर

 belgaum

बेळगांव प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्थात आरटीओ कार्यालयासाठी शहरानजीकच्या यमनापुर या गावांमध्ये 4 एकर जागा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.

आरटीओ कार्यालय आवारामध्ये आज सोमवारी आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यमनापुर गावातील संबंधित जागा मंजूर करून घेताना अनेक अडचणी आल्या परंतु सर्व अडचणींवर मात करून जागा मंजूर करून घेण्यात यश आले आहे असे सांगून आता या जागेवर नूतन इमारत उभारणी संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना आमदार बेनके यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिली.

ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी कणबर्गी गावानजीक ड्रायव्हिंग चांचणीसाठी जो सुसज्ज ट्रॅक 8 कोटी 23 लाख खर्चून तयार करण्यात येत आहे, त्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती देखील आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.