रामतीर्थ नगर येथील हॉकी स्टेडियमला ऑलम्पिक हॉकीपटू बंडू पाटील यांचे नाव देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अनगोळ भूसंपादन विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आक्षेपावर चर्चा करण्यात येणार आहे, असे बुडाच्या सर्वसाधारण बैठकीत अध्यक्ष धुळाप्पा होसमनी यांनी सांगितले आहे.
नुकतीच ही बैठक पार पडली. यावेळी या चर्चा करण्यात आल्या. 50 50 फार्मूला नुसार ही योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांची चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीच्या अजेंड्यावर 65 विषय होते. त्यामुळे जम्बो अजिंठ्यावर दिवसभर ही बैठक चालली होती.
काही विषयावर चर्चा करून ही बैठक लवकरच आटोपती घेण्यात आली. हॉकी संघटनेच्या वतीने रामतीर्थ नगर येथे हॉकी स्टेडियम उभारणी करण्यात येणार आहे. सदर स्टेडियमला बंडू पाटील यांचे नाव देण्याची मागणी बुडाकडे करण्यात आली होती. त्यामुळे या विषयावर चर्चा करून स्टेडियमला बंडू पाटील यांचे नाव देण्यास मंजुरी मिळाली आहे.
अनगोळ येथील शेत जमीन संपादन करून त्याठिकाणी वसाहती बांधण्याचा विचार करून बुडाने शेतकऱ्यांना नोटीस पाठवली होती. त्याविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठून याला विरोध दर्शवला होता. या विषयावर बुडाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे 50 50 तत्वावर शेतकऱ्यांकडून संमती घेण्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचेही ठरविण्यात आले आहे.
जागेच्या विनियोगात बदल करणे सिंगल लेआउट आणि खासगी लेआउट मंजुरी देणे त्याचप्रमाणे कुमारस्वामी लेआऊट येथे नाल्यांचे बांधकाम रामतीर्थ नगर येथील मुख्य रस्त्याच्या विकास अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आमदार अनिल बेनके, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे महानगरपालिका आयुक्त जगदीश के एच, तसेच बुडाचे नगर योजना अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.