Monday, January 27, 2025

/

काय आहे ‘प्रयत्न फ्रिज’ ची संकल्पना

 belgaum

बेळगावमध्ये गरजू नागरिकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजेच महेश फाउंडेशन. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजवंतांना मदत केली जाते. आज महेश फाउंडेशनच्यावतीने ‘प्रयत्न फ्रीज’चा शुभारंभ करण्यात आला.

या फ्रिजमध्ये आपल्याकडे असलेले शिल्लक अन्न, तसेच कपडे, लेखन साहित्य किंवा कोणत्याही पद्धतीच्या दुसऱ्याला उपयुक्त ठरतील अशा गोष्टी एकत्रित करता येतात. या फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू एखाद्या गरजवंताला उपयुक्त ठरतील, अशी यामागील भावना आहे.

या फ्रिजची संकल्पना ही समाजातील गरजू जनतेसाठी असून आवंतांच्या मदतीसाठी हे फ्रिज नक्कीच फायदेशीर ठरेल. बेळगाव आणि परिसरातील जनतेने आपल्या उपयोगात नसलेल्या वस्तू या फ्रिजमध्ये आणून द्याव्यात, जेणेकरून याचा लाभ समाजातील गरजू व्यक्तींना होईल. या फ्रिजसोबत आणखी एका कपाटाची व्यवस्था करण्यात आली आहे.prayatna

 belgaum

समाजातील गरजवंतांना याचा लाभ व्हावा यासाठी हॉटेल्स, दुकाने, सार्वजनिक ठिकाणी या फ्रिज आणि कपाटाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

ज्या ज्या ठिकाणी हे फ्रिज उपलब्ध असतील त्या ठिकाणी जनतेने आपल्याकडील निरुपयोगी वस्तू, शिल्लक अन्न याठिकाणी जमा करावे, आणि अधिक माहितीसाठी 7353767637/8494945327.या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.