भारतात गाईला गोमाता मानण्यात येते. गोमातेचे संरक्षण करण्यासाठी कर्नाटक सरकारने विविध उपाय योजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून, गो-संपत्तीबाबत माहिती गोळा करण्यात आली आहे. गोमातेचे संरक्षण करण्यासाठी कर्नाटक सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही, पशु संगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
बेळगावच्या पशुपालन विभागाच्या उपनिर्देशक कार्यालयात प्रगती आढावा बैठक आयोजिण्यात आली होती. या बैठकीला पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान म्हणाले कि, रविवारी जनावरांच्या उपचारासाठी नकार देणाऱ्या आणि दुर्लक्ष करणाऱ्या वैद्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. गोरक्षण हे सरकारची प्राथमिकता आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जनावरांवर योग्यवेळी योग्य उपचार करण्यात यावेत. ग्रामीण भागातील जनावरांवर उपचार करण्यासाठी वॉर रूमला प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी या वॉर रूमशी संपर्क साधून याचा लाभ घ्यावा, तसेच या वॉर रुमसंदर्भात माहिती घ्यावी. पशुवैद्यांकडून तात्काळ सेवा मिळवावी, असे आवाहन प्रभू चौहान यांनी केले.
राज्यात पशु संगोपनाला प्रोत्साहन देण्यासाठी, गोमातेचे संरक्षण करण्यासाठी आणि गोहत्या रोखण्यासाठी, सरकारने विविध उपक्रम आणि उपाय योजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील 15 जिल्ह्यात पशु संजीवनी योजनेअंतर्गत, वैद्यकीय उपचार सेवेसाठी रुग्णवाहिका सुरू करण्यात आलेल्या आहेत. नजीकच्या काळात अन्य जिल्ह्यातही पशु संजीवनी रुग्णवाहिका सेवा सुरू होणार आहेत.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहिती नंतर त्यांच्या दरवाज्यात जाऊन आजारी जनावरांची तपासणी केली जाणार आहे.जनावरांवर योग्य ते उपचार केले जाणार आहेत. पशु संगोपना संदर्भात प्राणी कल्याण मंडळाला उत्तेजना देण्यात येत आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात जनावरांसाठी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार असून, जनावरांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष होता काम नये, यासाठी त्यांनी सूचना दिल्या. कोरोना पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. शिवाय पशुसंवर्धन विभागातील सुमारे १८००० रिक्त पदांवर भरती करण्याचीही त्यांनी माहिती दिली. अथणी तालुक्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला पशुसंवर्धन विभागाच्या संचालिका सोनाली सरनोबत, पशुसंगोपन विभागाचे उपनिर्देशक अशोक कोळळ तसेच तालुक्यातील अधिकारी आणि इतर उपस्थित होते.