बेळगाव तालुक्यात भात कापणी आणि मळणीला जोमात सुरुवात झाली आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या सुगी कामाला वेग आला असून अनेक जण कामात गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे.
मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती तर शेतकरी चिंतेत होते. मात्र पुन्हा वातावरण थंडीचे निर्माण झाल्याने सुगी कामांना मळण्याना वेग आला आहे.
सध्या शेतकरी भात कापणी आणि मळणी करण्यात व्यग्र झाला आहे. मागील वर्षी प्रमाणे या वर्षी पावसाने सुरुवात केल्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत सापडला होता. मात्र यावर्षी पावसाने काही प्रमाणात शेतकऱ्यांची साथ दिली आहे तर हिवाळ्यात ही अशाच प्रकारे शेतकऱ्यांना अनेक समशयाना तोंड द्यावी अशी आशा व्यक्त होत आहे.
दरम्यान मागील आठवडाभरापासून पाऊस कमी झाला असला तरी थंडीने मात्र जोर घेतला आहे सध्या बेळगावचा पारा 13 अंशा वर पोहोचला आहे तर दोन दिवसांपूर्वीच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत होता आता पुन्हा पेरणी आणि मळणीच्या कामात शेतकरी गुंतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आणखीन पंधरा दिवस असेच चित्र राहिले तर शेतकरी आपली कामे पूर्ण करून घेणार आहे. दरम्यान यामुळे शेतकरी बटाटा लागवड व इतर पिकांच्या पेरणी करण्याच्या कामात गुंतल्याचे चित्र निर्माण होणार आहे सध्या तरी शेतकरी कामात व्यग्र आहे.