Wednesday, January 15, 2025

/

उत्तर आमदारांचे वादग्रस्त वक्तव्य-

 belgaum

गेली 65 वर्षे बेळगावातील मराठी भाषिक लोकशाही मार्गातून लढत असताना बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी सीमा प्रश्ना बाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

शनिवारी सांबरा विमानतळावर बेनके यांना पत्रकारांनी महाराष्ट्राचे नेते बेळगाव कारवार सह सीमाभाग महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे असं म्हणतात यावर तुमची प्रतिक्रिया काय असे विचारलं असता ‘गेली सत्तर वर्षे महाराष्ट्रातील नेते हेच सांगत आलेत हे कधी शक्य झाले आहे का?प्रत्येक वेळेला प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रातून एक प्रतिक्रिया येत असते आम्ही त्याला किंमत द्यायची गरज नाही असे म्हणत बेळगावातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठा समाज आणि मराठी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत यामधील फरक समजून घ्या.मराठा विकास प्राधिकरनाची सथापणा मराठा समाजाची विकास करण्यासाठी करण्यात आली आहे.एकीकरण समितीने ने देखील या प्राधिकारणाला विरोध करणे कितपत योग्य आहे? कन्नड बोलणारे मराठा समाज बांधव खुप आहेत त्यांचं नुकसान होऊ नये याचा देखील विचार व्हायला हवा असेही म्हणाले.

कर्नाटकात मराठा समाजात कन्नड बोलणाऱ्याची संख्या भरपूर आहे अश्यावर अन्याय होता कामा नये असेही ते म्हणाले.

आमदार साहेब आज खरच खाल्या मिठाला जानलात म्हणावं लागेल तुम्ही कितीही कोंबड झाकण्याचा प्रयत्न केला तरी संयुक्त महाराष्ट्राचा सूर्य उगवायचा राहणार नाही अशी प्रतिक्रिया युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिली आहे.
ज्यांनी तुम्हाला मराठा किंवा मराठी म्हणून मत दिली त्यांना मात्र घरचा आहेर दिलात, आता तरी बेळगावातल्या मराठी लोकांनी शहाणं व्हावं. आणि हो 20 लाख मराठीभाषिक सिमावासीय आणि शेकडो हुतात्म्यांचा तळतळाट घेऊन भलेभले अस्तित्व गमावून बसलेत, आता दिवस मोजायला सुरुवात करा असे प्रत्युत्तर शुभम यांनी दिलं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.