Monday, November 18, 2024

/

मोबाईलवर गेम खेळू नका म्हटल्याने आत्महत्या

 belgaum

आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून बेळगावमध्ये एकाने क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मोबाईलवर सातत्याने गेम खेळणाऱ्या पतीला पत्नीने गेम खेळू नका असे सांगितल्यावर पतीने रागाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

मूळचा चिक्कमंगळूर आणि सध्या राहणार खडेबाजार येथील शहाबाज सी. एम. (वय ३६ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून सातत्याने मोबाईलवर व्हिडीओ गेम खेळत असणाऱ्या पतीला गेम खेळू नको असे सांगितल्याचा राग आला.

आणि रागाच्या भरात खडेबाजार येथील सूर्या लॉज येथील खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून या प्रकरणाची नोंद मार्केट पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.