कर्नाटक राज्यातील मराठा समाजाची बैठक मराठा क्रांती मोर्चा – एक मराठा लाख मराठा च्या वतीने दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक धारवाड येथील मराठा विद्या प्रसारक मंडळ येथे होणार आहे.
या बैठकीत आरक्षण, मराठा समाजाला ३बी मधून २या या गटात समाविष्ट करणे यासोबत इतर विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून कर्नाटकात मराठा आरक्षणविषयी होत असलेल्या मागणीबद्दलही चर्चा करण्यात येणार आहे.
मराठा क्रांती मोर्चा – एक मराठा लाख मराठाच्या वतीने सरकारकडे अनेकवेळा निवेदने देऊन मागण्या करण्यात आल्या आहेत. परंतु आजपर्यंत सरकारने याकडे दुर्लक्ष केले असून अजूनही आमची मागणी मान्य करण्यात आली नाही. यासंदर्भात पुढील वाटचाल ठरविण्यासाठी वरिष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीला पी. जी. आर. सिंधिया, एस. आर. मोरे, एम. जी. मुळे, काकासाहेब पाटील, वेंकटराव घोरपडे, मारुतीराव पवार, प्रभाकर राणे, अरविंद पाटील (खानापूर), अनिल लाड, संतोष लाड, श्रीनिवास माने, एस. एल. गोठणेकर, डॉ. अंजली निंबाळकर, अनिल बेनके, रूप नायक,श्रीमंत पाटील बेळगावातून रमेश गोरल किरण जाधव,यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या बैठकीला मराठा समाजातील सामाजिक कार्यकर्ते, राज्यकर्ते, राजकीय नेते, उद्योजक आणि इतरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.