शहिदांच्या जन्मभूमीची माती गोळा करणारा असा “हा” देशभक्त

0
2
Shankar gowda
 belgaum

जम्मू काश्मीर येथील नियोजित युद्ध स्मारकासाठी स्वयंस्फूर्तीने देशातील शहीद जवानांच्या जन्मभूमीची माती गोळा करण्यासाठी देशाटनास निघालेल्या बेंगलोरच्या उमेश जाधव यांचे आज बुधवारी सकाळी बेळगांवमध्ये उस्फुर्त स्वागत करण्यात आले. देशभक्त उमेश जाधव यांनी आपल्या कारसह आतापर्यंत सुमारे 67 हजार कि. मी.चा प्रवास केला आहे.

बेळगांव शहरात आज बुधवारी सकाळी आपल्या कारसह दाखल झालेल्या युवा देशभक्त उमेश जाधव यांचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील हे याप्रसंगी जातीने उपस्थित होते. त्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्याद्वारे उमेश जाधव यांचे बेळगांवात स्वागत केले.

मूळचे औरंगाबाद महाराष्ट्र येथील रहिवासी असणारे उमेश जाधव हे बेंगलोर येथे लहानाचे मोठे झाले. नव्या बलशाली व समृद्ध भारताचे स्वप्न पाहणाऱ्या उमेश जाधव यांनी जम्मू काश्मीर येथील युद्ध स्मारकासाठी देशातील शहीद जवानांच्या जन्मभूमीतील पवित्र माती जमा करण्याच्या आपल्या मोहिमेला 9 एप्रिल 2019 रोजी प्रारंभ केला. बेंगलोरच्या ग्रुपसेंटर सीआरपीएफ येथून डीआयजी सनतकुमार यांच्या ध्वज दाखवून सदर मोहिमेचा शुभारंभ झाला. त्यानंतर उमेश जाधव यांनी आपल्या कारगाडीमधून सुमारे 67 हजार कि. मी. अंतराचा प्रवास करून विविध ठिकाणच्या शहीद जवानांच्या जन्म स्थानांची माती गोळा केली आहे.Shankar gowda

 belgaum

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या एप्रिल महिन्यातपासून जाधव यांच्या या मोहिमेमध्ये खंड पडला होता. तथापि 21 ऑक्टोबर 2020 पासून उमेश जाधव यांनी आपल्या या देशभक्तीपर मोहिमेला पुनश्च सुरुवात केली आहे. गेल्या 21 ऑक्टोबर रोजी बेंगलोर येथे आयपीएस भास्करराव यांनी ध्वज दाखवून उमेश जाधव यांच्या उपक्रमाला चालना दिली. आज बेळगांवात दाखल झालेले उमेश जाधव येथून पुढे कोल्हापूर आणि त्यानंतर संपूर्ण भारतभर असा एकूण 1.20 लाख कि. मी. अंतराचा प्रवास करणार आहेत.

नया भारत अर्थात नवा समृद्ध बलशाली भारताची निर्मिती हे माझे स्वप्न असून कोणत्याही पुरस्कर्त्यांची मदत न घेता देशासाठी आणि सरकारसाठी मी ही मोहीम राबवत आहे. बोलणे खूप झाले आता कृती करण्याची वेळ आहे. आता प्रत्येकाने देशासाठी काहीतरी करायची गरज आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन नव्या भारताची निर्मिती करावी, असे आवाहन करून आपल्या या मोहिमेची सांगता पुढील वर्षी 9 एप्रिल 2021 रोजी कच्छच्या वाळवंटात होणार असल्याची माहिती उमेश जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.