देशातील प्रतिष्ठित ललित कला अकॅडमीच्या सदस्य डॉ. सोनाली सरनोबत यांनी नवी दिल्ली येथे भारतीय सांस्कृतीक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
सदर भेटीप्रसंगी ललित कला अकादमी समोरील आव्हाने आणि संधी यासंदर्भात डाॅ. सोनाली सरनोबत आणि ख्यातनाम शिल्पकार उत्तम पचरणे यांनी डॉ सहस्त्रबुद्धे यांच्याशी चर्चा केली.
चर्चेअंती यासंदर्भात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन सहस्त्रबुद्धे यांनी दिले.दरम्यान सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये उत्तर कर्नाटकसाठी ललित कला अकादमीचे प्रादेशिक केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव डाॅ. सोनाली सरनोबत यांनी मांडला आहे.
या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.डॉ सोनाली सरनोबत यांची ललित कला अकादमीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे सरनोबत बेळगावात ललित कला अकादमीचे कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.