कागीनेले पिठाचे श्री निरंजनानंदपुरी स्वामीजींच्या नेतृत्वाखाली खासदार आणि आमदारांच्या प्रतिनिधींनी आज सकाळी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या गृहकचेरीत मुख्यमंत्र्यांची भेट घेत कुरबर समाजाचा समावेश परिशिष्ट जातीत करावा अशी मागणी केली. यासंदर्भात केंद्राकडे शिफारस करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांना करण्यात आला.
कुरबर समाजाचा समावेश परिशिष्ट जातीत करण्यात यावा, यासाठी अनेकवेळा आग्रह करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने मराठा आणि वीरशैव लिंगायत समाजासाठी प्राधिकरणाची घोषणा केली आहे. या समाजाच्या विकासासाठी ज्यापद्धतीने पाऊल पुढे टाकण्यात आले आहे, त्याप्रमाणे कुरबर समाजाचाही विचार करून आमची मागणी मान्य करावी, असा आग्रह यावेळी करण्यात आला. कुरबर समाजाप्रमाणेच विणकर समाज तसेच इतर अनेक समाजाच्या विकासासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.



