खानापूर पोलिसांच्या वतीने विशेष कारवाई अंतर्गत सोने चोरी करणाऱ्या आणि चोरीचे सोने विकत घेणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत सोने विकत घेणाऱ्या एका सराफाला अटक करण्यात आली आहे. सोन्याचे दागिने चोरून त्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
हे चोरीचे दागिने एका सराफाला विकण्यात येत होते. २ लाख ६५ हजार ३०० रुपये किमतीचे हे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. शिवाय या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीला सहाय्य्य करणाऱ्या सराफालाही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील वडगाव गल्लीतील गुदेव येथील निवासी परशुराम दंडगल्ली नामक आरोपीला अटक करण्यात आली असून या आरोपीला मदत करणाऱ्या खासबाग येथील श्री साईराम ज्वेलर्सचा मालक विनय अणवेकर यालाही अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून प्राथमिक चौकशी दरम्यान याबद्दलची अधिक माहिती उपलब्ध झाली असून अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. हि कारवाई खानापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय सुरेश पी. शिंगे यांच्या नेतृत्वाखालील सहकाऱ्यांनी पार पडली आहे. या कारवाईत सोन्यासह इतर अनेक वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील सराफाकडून ७९ ग्रॅमचे सोन्याचे दागिने तसेच १३५ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.