कर्नाटकातील सर्वोच्च मानल्या क्रीडाक्षेत्रातील एकलव्य पुरस्काराने प्रख्यात आंतरराष्ट्रीय ज्युडोपटू गीता के.दानप्पागोळ यांना गौरविण्यात आले आहे.
बंगलोर येथे विधानसौध येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात गीता यांना मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या हस्ते एकलव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी महसूल मंत्री आर.अशोक,क्रीडा मंत्री सी टी रवी उपस्थित होते.
गीता या बेळगाव जिल्हा युवजन सेवा क्रीडा खात्याच्या वसतिगृहातील माजी विद्यार्थिनी आहेत. येथेच त्यांनी ज्यूडोचे प्रशिक्षण घेतले आणि उत्कृष्ट ज्युडोपटू म्हणून नावलौकिक कमावला.एम .एन .त्रिवेणी व जितेंद्र सिंग यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यापूर्वी बेळगावमधील अष्टे (चंदगड) गावची कन्या रोहिणी पाटील, तुरमुरी गावची मलप्रभा जाधव जिने एशियन गेम्स मध्ये मेडल मिळवत बेळगावचं नाव उज्वल केलेली अश्या या दोन ज्युडोपटुंना याआधी एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात होते.
आता बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील नागणुर गावची गीता के.दानप्पागोळ या तिसऱ्या ज्युडोपटुला सन्मानित करण्यात आल्याने बेळगावच्या क्रीडाक्षेत्रात मनाचा तुरा रोवला गेला आहे.