Wednesday, December 25, 2024

/

केंव्हा शहाणे होणार स्मार्ट सिटीचे कंत्राटदार?

 belgaum

धर्मवीर संभाजी चौक येथील केळकर बागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडी पसरवून टाकणाऱ्या कंत्राटदाराने आता या ठिकाणचे एक चेंबर खुले ठेवल्यामुळे कारचे नुकसान झाल्याची घटना आज सोमवारी घडली.

धर्मवीर संभाजी चौक येथील केळकर बागेकडे जाणारा रस्ता त्याठिकाणी टाकण्यात आलेल्या खडीमुळे नुकताच चर्चेत आला आहे. या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडी मुळे ये -जा करणाऱ्या पादचाऱ्यांसह दुचाकी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मोठ्या प्रमाणातील खडीमुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. यात भर म्हणून कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे आता या ठिकाणी रस्त्यावर खुले सोडण्यात आलेले एक चेंबर सर्वांसाठी धोकादायक ठरत आहे.

रस्त्यालगत असणाऱ्या या चेंबरचा कार चालकाला अंदाज न आल्यामुळे आज एक कारगाडी नुकसानग्रस्त झाल्याची घटना घडली. तेंव्हा आता तरी बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील चेंबर खुले ठेवणाऱ्या आणि फक्त खडी टाकून रस्ता धोकादायक बनविणाऱ्या संबंधित बेजवाबदार कंत्राटदाराला चांगली समज द्यावी. तसेच केळकर बागेकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याबरोबरच संबंधित धोकादायक चेंबर बंदिस्त करावे, अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.