Sunday, December 22, 2024

/

कळसा कळसा-भांडुरा प्रकरणी सोमवारी महत्वपूर्ण बैठक

 belgaum

जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या माध्यमातून कळसा – भांडुरा प्रकल्प राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सोमवारी एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

कळसा-भांडुरा तसेच गट्टी बसवण्णा येथील पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह अन्य सिंचन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली या उच्च्स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली असून या सभेला जिल्हाधिकारी, जलसंपदा मंत्री तसेच अरण्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभाग घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.