बेळगाव शहराला होणारा पाणीपुरवठा पाणी पुरवठा मंडळाकडून एका खाजगी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येणार असून पाणी पुरवठ्याचे व दर ठरविण्याचे सर्व अधिकार महानगरपालिका किंवा पाणी पुरवठा मंडळाकडे न राहता खाजगी कंपनीकडे राहणार आहेत.
ही बातमी बेळगाव माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर येताच माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक माजी महापौर व संघटनेचे अध्यक्ष नागेश सातेरी यांच्या अध्यक्षतेखाली रामदेव गल्ली येथील शहिद भगतसिंग सभागृहात घेण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीला माजी नगरसेवक दीपक वाघेला यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितलं. नागेश सातेरी यांनी प्रास्ताविक करून बेळगावच्या पाणी पुरवठ्याबाबत बेळगाव नगरपालिका व बेळगाव महानगरपालिकेत काय कोणत्या गोष्टी घडल्या याचा आढावा सांगितला. पण पाणी पुरवठाच्या खाजगीकरणाने येणाऱ्या अडचणींचाही आढावा घेतला. याबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीला माजी आमदार रमेश कुडची, लतिफखान पठाण, राजू मुर्कीभावी, रमेश कळसन्नावर, रमेश सोनटक्की, नेताजीराव जाधव, दीपक जमखंडी, वर्षा आजरेकर, शीला देशपांडे, धनराज गवळी, संजीव प्रभू आदी उपास्थीत होते.