राज्यात “लव्ह जिहाद”वर प्रतिबंध घालण्यासाठी खास नवा कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे.
बेंगलोर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बोम्मई यांनी उपरोक्त माहिती दिली. लव्ह जिहादद्वारे राज्यातील युवापिढीला विचलित करून भरकटले जात असून हे योग्य नाही.
यासाठी लवकरच खास नवा कायदा अंमलात आणला जाईल. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कायदेपंडित पंडितांची रितसर बैठक घेऊन चर्चा केली जाईल, असेही गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.