आयएमए प्रकरणातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित असलेले माजी मंत्री रोशन बेग यांना सीबीआयने अटक केली आहे.
आज सायंकाळी त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रोशन बेग यांची परप्पन अग्रहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
रोशन बेग आयएमए प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.