Monday, January 20, 2025

/

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत यांचा झाला विजय

 belgaum

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संघटनेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका सोमवारी घेण्यात आल्या.निवडणुकीत खालील उमेदवारानी विजय मिळवले आहेत. एकूण पाच जगासाठी 8जणांनी निवडणूक लढवली होती.एकूण 504 मते पडली त्यातील 8 मते बाद झाली.

व्यापार क्षेत्रासाठी 504 सदस्यांनी मतदान केले. यामध्ये हेमेंद्र पोरवाल ( 343), राजेंद्र मुतगेकर (300), संजय पोतदार ( 367), संतोष कलघटगी ( 300 ) आणि विक्रम जैन (275) यांनी भरघोस मते मिळविली. सुधीर चौगले हे सर्वसाधारण मतदार संघातून बिनविरोध निवडून आले आहेत.

उद्योग क्षेत्रातील 3 जागांसाठी चार उमेदवारांनी निवडणूक लढविली. यासाठी एकूण 220 जणांनी मतदान केले. रोहन जुवळी (216), प्रभाकर नागरमुनोळी ( 211 ) आणि आनंद देसाई (208 ) हे उमेदवार विजयी ठरले. सतीश कुलकर्णी सर्वसाधारण मतदार संघातून बिनविरोध निवडून आले आहेत.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.